Time Machine

Time Machine चा अजून जरी शोध लागला नसला आणि Teleportation वर संशोधकांच काम सुरू असलं तरी एक नैसर्गिक Time Travel device तर म्हणता येणार नाही त्याला पण System शब्द शोभेल असं एक Time Travel System ते म्हणजे वास. मग तो घाण असो वा चांगला. (टिप :- मी फक्त चांगल्या वासाबद्दल 😅 बोलतोय.) त्यातल्या त्यात भजी तळताना येणारा आणि  "कांदा-कोथिंबीर-टोमॅटो" यांचा एकत्रित मस्त सुवास जेव्हा येतो ना, तेव्हा तो आपल्याला एका क्षणात किती तरी जुन्या आठवणी आणि ठिकाणांना फिरवून आणतो. यांचं combination म्हटलं की पहिला डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे भेळ.! मला तर भेळ तयार होत असताना मधेच हातावर थोडा नुसता कच्चा कांदा आणि कोथिंबीर खायला आवडतं. तोंडापासून पोटापर्यंत सगळीकडे मस्त दवंडी पिटली जाते – थोडं थांबा … भेळ येतेय !! ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना, त्यात अधूनमधून पाहिजे त्या प्रमाणात चिंचेची चटणी आणि मिरचीचा ठेचा अथवा लाल तिखट टाकताना, भांड्यात मोठा चमचा वाजवत भेळवाले जो आवाज करतात तो ऐकत रहावा असं वाटतं. तो आवाज अजूनही घुमतोय ना कानात आणि मनात.? मग भेळवाले थोडी भेळ प्लेटमधे घेऊन त्यावर छान पिवळया रंगाची बारीक शेव आणि अगदी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर असा साज चढवतात ! ती प्लेट हातात आल्यावर मग आपले हात आणि तोंड सुरू होतात. एक घास, अजून एक , अजून एक घास असं करत बघता बघता त्या चटकदार भेळेची पहिली प्लेट रिकामीही होते. आणि मग शेवटी शेव-चिरमुरा अथवा एखादी मसाला पुरी खाणं म्हणजे स्वर्गसुखच..!! आता भज्याचंही तसंच. असं वाटतं की या भजी तळताना येणा-या वासाची प्रवास क्षमता तपासून पहावी, येवढ्या लांब लांबून तो दरवळत येत असतो. आणि संततधार पाऊस, थंड हवा, एखादी छोटीशी टपरी, तिथं निव्वळ आपल्यासाठी त्या उकळत्या तेलात उड्या टाकणारे ते मिरची, कांदा, बटाटे, पाव, तळलेल्या मिरच्या यांचा सुवास आणि या सर्वांचा आस्वाद घेत अधेमधे वाफाळत्या चहाचा एक एक घोट जगात भारी राव.
कुरकुरीत कांदा-भजी आणि बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस म्हणजे ( like लोकशाही ) पोटशाहीचा घात न करता वर्षानुवर्षे चालत आलेली कधीही न तुटणारी युतीच.
माझं तर हा कोरोना आल्यापासून रतीब चुकलाय नाहीतर एक दिवस असा जात नाही की वडापाव किंवा भजी खाल्ली नाहीत. 
ऋतु कोणताही असो
आवडतं नेहमी खावं..
पोटाची काळजी करताना कधी कधी
जिभेचंही लाड पुरवावं..
एकदाच मिळत आयुष्य,
मनमुराद मस्तीत जगावं.. 
चहा कॉफी भजी खात,
सोबत पावसात पण भिजावं..!
😇☕🌧️🌨️
( सौजन्य :- अध्यक्ष ऐसेच मन को वाट्या तो लिख डाल्या रे संघटना )
#आयुष्य_वगैरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..