२ सप्टेंबर, २०२३
तुला प्रत्यक्ष पहायची ओढ लागली होती,
खूप खूप दिवसांनी पुन्हा एकदा
तुझी वाट पहायचं थ्रिल अनुभवायचं होतं,
तू ट्रेनमधून बाहेर पडल्यापासून तुझ्या मागं मागं होतो,
पण काही केल्या पुढं यायचं धाडस होत नव्हतं.
चिमणीचे फोटो वगैरे पाहताना ती खूप मोठी झालीयं, असं वाटतं, पण खरंतर ती कित्ती कित्ती छोटीशी आहे.
तुम्हा दोघींना न्याहाळत, तुमच्या सोबत,
तुमच्या मागं मागं फिरताना मला कित्ती मस्त वाटतं होतं.
खूपदा वाटत होतं की, मागून आवाज देऊन तुला थांबवावं, पण तुला घ्यायला कुणी आलं आहे की नाही.? या माझ्या मेसेजच उत्तर मला अजूनही न मिळाल्यामुळे, कुणीतरी घ्यायला आलं असेल, असा विचार करून माझी हिंमतच होत नव्हती. म्हणून मग आपण पाय-या उतरून एक नंबर फलाटावर आल्यावर, मी मुद्दामच, तुझ्या बाजूने, तुला दिसावं असा पुढे पुढे आलो, आणि तू चक्क माझ्याकडं पाहून हसलीस. एक दोनदा नाही, तर आज खूप वेळा आपली नजरानजर झाली, तू माझ्याकडे पाहिली, गोड गोड हसली.! यानिमित्ताने आज आणखीन एक आठवण माझ्या मनात खोलवर घर करून बसली.!
#स्वप्नं
#अडगळ
#पाठलाग_निरागस_स्वप्नांचा