किल्ला

शाळेला दिवाळी सुट्टी लागण्याआधीच #किल्ला बनवायची तयारी सुरू झालेली असायची. शेवटचा पेपर संपला की, किल्ल्यावर शेवटचा हात मारला जायचा. नागमोडी वळणाच्या पाय-या, ठरावीक ठिकाणी विहीर, घराच्या कौलाच्या खाप-या काढून गुफा बनवणं, खराट्याच्या काड्या लावून आजूबाजूला भक्कम तटबंदी आणि थोडासा खोलवर खड्डा काढून, त्यात पाणी सोडून #खंदक वगैरे.
मग दररोज उठून सर्वात पहिला मोर्चा वळायचा ते थेट किल्ल्याकडेच. किल्ल्यावर आणि आजूबाजूला टाकलेली हळीव, मोहरी उगवली आहे की नाही पहायचं, पाय-या आणि बुरुजावर टोचलेली खपली नीट उगवली आहे की नाही ते पाहणं वगैरे वगैरे. वर्षानुवर्षे त्या एका बॉक्सात जपून ठेवलेली ती #सैनिकं हळूहळू बाहेर काढणं, आणि किल्ल्यांवर ठिकठिकाणी मांडणं. छोटे छोटे भगवे ध्वज तयार करून किल्ल्यावर ठिकठिकाणी लावणं, आपण मुद्दामहून वेचून आणलेली ठराविक हिरवी सैनिक आणि आपली सैनिक यांना समोरासमोर उभं करून लढताना दाखवणं. सर्वात उंच अग्रभागी दिमाखात बसलेल्या आपल्या छत्रपतीं समोर, एका इंग्रजाला मुजरा करताना अवस्थेत उभं करणं.! आणखीन ही कित्ती काही.!🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..