ताई
प्रिय ताई, नमस्कार..! 🙏
पत्रास कारण की,
एक तारीख
ज्या तारखेचं अगदी बालपणापासून
खूप खूप कौतुक आहे,
अशी ती तारीख म्हणजे ११/११.
तुझ्या आयुष्यातील
आणि तुझ्याशी निगडित सर्वांच्या आयुष्यातील
अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस,
म्हणजे तुझा वाढदिवस..!
या धावपळीच्या आयुष्यात,
कधी कधी तुला या दिवशी शुभेच्छा द्यायचं राहून जातं,
पण या दिवशी तुझी आठवण आली नाही,
असं आजपर्यंत कधीच झालं नाही,
आणि होणार ही नाही. बालपणापासून ते अगदी तरूणपणात पदार्पण करेपर्यंत,
आपल्या कितीतरी कडू गोड आठवणींचे
आपण साक्षीदार राहिलो आहोत.
आता त्यापैकी ब-याचशा आठवणी ह्या
विस्मृतीत गेल्या असल्या तरीही,
अजूनही कधी कधी ते जुने दिवस आठवले की,
वाटून जातं की, खरंच बरं होतं ते बालपण,
उगाचच मोठे झालो आपण.
कधी कधी मी जेव्हा गार्गीला पाहतो ना,
तेव्हा मला मी तुझ्या घरी यायचो तेव्हाचे दिवस आठवतात, आणि तेव्हाची ती, छोटीशी तू, कधी कधी अचानक डोळ्यासमोर उभी राहतेस.
ब-यापैकी आपल्या सगळ्याचं असंच होतं गं,
बोलायचं तर खूप काही असतं, पण राहून जातं.
नेहमीच आनंदी असतेस आणि नेहमी अशीच रहा,
काळजी घे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या आणि दिपावलीच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा..!
शुभ दिपावली..!🪔🪔🪔
🍫🍫🍫
आई-बाबांना साष्टांग नमस्कार.!🙏
भाऊजींना सप्रेम नमस्कार, 🙏
आणि सर्व बच्चे कंपनीला गोड गोड मुका.!😘