Delete

मोबाईलच्या गॅलरीत जपून ठेवलेला
तुझा एखादा फोटो डिलीट करताना
delete आणि undo यांच्यात तुफान हाणामारी होते,
मोबाईलची गॅलरी रक्तबंबाळ होते,
कंठ दाटून येतो,
काळवेळ न पाहता डोळे टचकन पाण्याने भरून येतात.
मग तू तर माझ्या आयुष्याचा भागच नाहीयेस,
फक्त एक आठवण बनून जगतोय तुला, अगदी मनसोक्त.
मग कित्ती रडलो असेन गं मी,
कित्ती रडतो गं मी, याचा हिशोबच नाही.
माझ्यासाठी नेहमीच सर्वात आधी तू असतेस,
आणि तुझ्यासाठी बहुतेक सर्वात शेवटी मी.!
बरोबर ना.!??
माझी साधी सावलीही पडली नाही कधी तुझ्यावर,
तरीही कधी, कुठे आणि कसा.? मी इतका तुझा होऊन गेलोय, ते माझं मलाच कळत नाही.!🎭
#अडगळ #काल्पनिक_वगैरे #जगण्याची_रीत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..