अडगळ
का कुणास ठाऊक,
पण आज त्याचं ते बोलणं मला खूप आठवत आहे.
बोलता बोलता तो नेहमी बोलून जायचा की,
रात्रीच्या झोपेचं पार खोबरं होऊन जातं यार.
माझे पप्पा खूप घोरतात रे.!
रात्री मी घरी असताना,
कानात हेडफोन्स वगैरे असतात,
तेव्हा काही वाटत नाही रे, पण ते काढून
झोपी जायचा प्रयत्न करू लागलो की,
पप्पाचं ते घोरणं एकसारखं कानावर येत राहतं.
मान्य की त्यांचं वय वगैरे झालंय आता,
पण तरीही it's so irritating यार..!!
पप्पा..
पप्पा...
अहो पप्पा... अशा हाका मारून,
किती घोरताय हो तुम्ही, असं म्हणून
त्यांना झोपेतून जागं करावं, तर तेवढ्यापुरतचं ५ - १० मिनिटे त्यांच्या घोरण्याचा आवाज बंद होतो,
आणि थोडावेळ गेला की,
पप्पाचं ते घोरणं पुन्हा सुरू व्हायचं.!
आता गेल्या महिनाभरापासून त्याचं घर अगदी शांत आहे, कारण त्याच्या पप्पांचं घोरणं कायमस्वरूपी थांबलं आहे. त्याला वाटणारी #अडगळ आता एक आठवण बनून, कायमस्वरूपी त्याच्या मनात घर करून बसली आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे