मढं

तो लहानपणी खूप भांडखोर होता.
घरी, शेजारी, गल्लीत, शाळेत सतत वाद
अथवा किरकोळ हाणामारी करत असायचा.
त्याचा एकुलता एक मोठा भाऊही
त्याच्याशी पटवून घेत नसायचा.
दररोज संध्याकाळी त्याचे आई-बाबा
शेतावरून घरी परतले की,
याचा मोठ्या भावाच्या नावाने आणि
किरकोळ व्यक्तीगत बारीकसारीक तक्रारींचा
पाढा सुरू व्हायचा. पण तेव्हा त्याची आई
त्याला म्हणायची की, रोजचंच झालंय हे तुझं.
आणि रोजचंच मढं, त्याला कोण रड.!?
मग बहुतेक तेव्हापासूनच तो हळूहळू मरत गेला.
आणि मढं स्वताहून कधी कुठे जात नाही,
म्हणून मग अधेमधे त्याला मिरवलं जायचं.
पुन्हा घरी परतल्यावर अडगळीत फेकलं जायचं.
आता जुनी झालेली ती घरची खोडं,
अडगळीत पडलेल्या त्या मढ्याकडे
कधी खूप  आशेने बघत असतात,
पण त्या मढ्यालाही आता सवय झालीय,
मढ्यासारखचं निर्जीव जगण्याची.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..