पाठलाग निरागस स्वप्नांचा
कधी कधी वाटतं की,
तुझ्याशी अजूनही खूप काही बोलायचं राहून गेलंय.
आणि कधी कधी वाटतं की,
आता बोलायला काहीच शिल्लक उरलं नाहीये बहुतेक.
आजही असचं काहीसं वाटते आहे बघ.
हां.., पण एक मात्र खरं की,
हा वेडा अजूनही खूप सारी वेडी स्वप्नं
उराशी बाळगून आहे. त्यापैकी
माझ्या मनाच्या अगदी जवळची, आणि
खूप खूप जुनी अशी स्वप्नं सांगायची झाली तर,
१) भल्या पहाटे पहाटे, तुझ्याशी गप्पा मारत आपलं घर ते #नरसोबाची_वाडी, चालत जायचं आहे.
तिथं तुझ्या सोबतीने देवदर्शन करायचं आहे,
एका पंगतीला, अगदी एकमेकांच्या बाजूला बसून
तीर्थप्रसाद घ्यायचा आहे, आणि शेवटी
पौर्णिमेच्या चंद्राला न्याहाळत, नदीकाठी खूप खूप उशीरापर्यंत तुझ्याशी बोलत बसायचं आहे.😌
२) RHTDM पिक्चरमध्ये मॅडीने रिनाचा बर्थडे,
ज्या पद्धतीने साजरा केला होता ना, अगदी तसाच,
मला तुझा एखादा तरी बर्थडे साजरा करायचा आहे.😌
३) मी नेहमीच तुला चोरट्या नजरेने पाहत आलोय,
पण निदान एकदा, एक दिवस तरी,
तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी वेळ काढावास,
आणि तो अखंड दिवस, मला-तुला शक्य असेल तितका जास्तीत जास्त वेळ, मला फक्त आणि फक्त तुलाच पाहत बसून रहायचं आहे.😌
ही ना माझी खूप खूप जुनी स्वप्नं आहेत. आणि स्वप्नं पूर्ण होवोत, अथवा ना होवोत, पण ती स्वप्नं पहायला, आणि त्यात रमायला काहीच हरकत नाही. बरोबर ना.? 🎭
#आयुष्य_वगैरे
#वेड 🌼🌼🌼
#एकतर्फी ♥️