रिया राणी

Happy Birthday to you रिया राणी..!💓🤗🎂

आत्ता आपली रिया राणी ज्या वयात आहे ना,
बालपणी तू आणि मी बहुतेक याच वयामध्ये असताना,
मी तुझ्या प्रेमात(एकतर्फी) पडलो होतो बघ.
तेव्हा मला तुझा बर्थडे वगैरे कधी आहे, हे काही माहित नव्हतं, आणि त्यानंतर ही बरीच वर्षे माहीत नव्हतं.
आणि तुझा बर्थडे अमुक दिवशी असतो, हे मला नेमकं कधी कळालं, हे मला आत्ता देखील अजिबात आठवत नाही. हां., पण जेव्हा कधी मला कळालं ना, की तुझा बर्थडे अमुक दिवशी असतो, तेव्हा पासून नेहमीच वाटायचं की, आपण हिला बर्थडे विश केलं पाहिजे.
छोटीशी का असेना, पण आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे. पण तेव्हा असा योग कधी जमून आलाच नाही. तुझा बर्थडे वगैरे असला की, मी तुझ्या घराजवळ घिरट्या घालायचो, पण बोलायची हिम्मतच व्हायची नाही. तेव्हा आमच्या घराजवळ फक्त शेजारच्या सरांच्या घरी लॅंडलाईन होता, आणि फोन नंबरची एक भली मोठी डिरेक्टरी ही होती. मग त्यातून मी तुझ्या पप्पांच्या नावाचा नंबर शोधून काढला होता. तेव्हा वाटायचं की, तुझ्या घरच्या लॅंडलाईनवर रात्री बारा वाजता फोन करून, तुला सर्वात आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात,
पण दुर्दैवाने ते ही कधी जमलंच नाही.
असेच हळूहळू दिवस पुढे सरकत होते.
मग सोशल मीडिया वगैरे जोरात सुरू झालं.
तेव्हाही मी फेसबुकवर खातं उघडण्यामागचं मुख्य कारण तूच होतीस, पण तिथंही तुला मेसेज करायची हिम्मत कधीच झाली नाही. पण तिथला तुझा DP मी सारखं पाहत असायचो. बरीच वर्षे तर तो अमृता रावचा फोटो तुझ्या DPला फिक्स होता.
आणि मग एके वर्षी हिंमतीने,
काय व्हायचं ते होऊदे, असं ठरवून मी मेसेज केलाच,
पण तेव्हा ही तुझा काहीच रिप्लाय आला नाही.
म्हणून मग मी पुन्हा फेसबुकवर ही तुला कधीच मेसेज केला नाही.
पण आत्ता ना, आपल्या रिया राणीला,
असं रात्री बारा वाजता बर्थडे विश करताना,
माझ्या मनातील, तुला तुझ्या बर्थडेला,
रात्री बारा वाजता सर्वात आधी बर्थडे विश करायची राहिलेली सलही, नकळतपणे भरून निघते आहे.!
याबद्दल मी खूप खूप आभारी आहे..!!😌🙏
#आयुष्य_वगैरे
#एकतर्फी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..