छे.... मला कुठे येते गं तुझी आठवण.?
छे.... मला कुठे येते गं तुझी आठवण.?
मी अगदी मस्त मजेत निवांत आहे.
मी नाही शोधत आता
अंगणात तुझ्या हातची रांगोळी,
मला नाही ऐकू येत आता
तुझ्या हातच्या बांगड्यांची किणकिण,
मला नाही जाणवत आता
तुझ्या पावलांचा तो लयबद्ध आवाज,
मला नाही भुलवत आता
तुझ्या पैंजणाचा तो साज,
दिसत नाही मला आता
ताटातल्या भाकरीवर तुझ्या बोटांची नक्षी,
माझी वाट पाहत नाहीत आता
तुझ्या नजरेचे ते उनाड पक्षी,
छे.... मला कुठे येते गं तुझी आठवण.?
मी अगदी मस्त मजेत निवांत आहे.
नाही आठवत तू मला आता
मी जेवायला बसल्यावर,
नाही आठवत मला ती आता
तुझ्या हातची चटणी भाकर,
किती छान करायचीस गं तू
ती तिखट सांडग्याची आमटी,
ती चवही आठवत नाही मला आता
तिखट सांडगा ताटात आल्यावर,
नाही बोलत गं माझ्याशी आता
ती तांब्या वाटीची जोडी,
किती खोड्या काढायचीस तू जेवताना
कित्ती वाढायची ना गं जेवणाची गोडी,
छे.... मला कुठे येते गं तुझी आठवण.?
मी अगदी मस्त मजेत निवांत आहे.
माझ्या कपड्यांना येत नाही आता
कंम्फर्टचा तो विषेश वास,
कपड्यांची घडीही विस्कटलेली अन्
फक्त नावालाच धुतलेला असतो
तो माझा हातरूमाल,
मी आरशात स्वतःला पाहताना आता
कुणीच माझ्या मागे थांबत नाही,
किती देखणं दिसतंय गं माझ्झं सोन्नं
असं म्हणून कुणीच माया करत नाही,
मी घरातून निघताना आता
कुणीच मला पाठमोरा पाहत नाही,
संध्याकाळी मी परतण्याची ही आता
तसं कुणीच वाट पाहत नाही,
छे.... मला कुठे येते गं तुझी आठवण.?
मी अगदी मस्त मजेत निवांत आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔
#अडगळ