पगार

पगाराचा दिवस जवळ येऊ लागला की,
महिनाभरापासून अडगळीत पडलेली बिलं
आनंदाने उड्या मारू लागतात.
कोप-यावरचा भाजीवाला,
दररोजचा दुधवाला ते पेठेतील किराणावाला,
या  सगळ्यांच्या आशादायी नजरा,
हळूहळू दररोज आपल्यावर रोखल्या जाऊ लागतात. पप्पांचा #पगार झाला की घेऊ,
या एका वाक्याने कोंडून ठेवलेली,
घरच्या चिमण्यापाखरांची स्वप्नांची फुलपाखरं,
मग आनंदाने बागडू लागतात.
शेवटी एकदाचा पगाराचा दिवस उजाडतो.
पगार देताना नेहमीप्रमाणेच मालकाचा हात आखडताच असतो. कसाबसा एकदाचा पगार हातात पडला की,
मग डोक्यात देण्यांचा हिशोब सुरू होतो.
आणि संध्याकाळी घरी परतेपर्यत
खिसा जवळपास रिकामाच होतो.
पुन्हा एकदा चिमणीपाखरं मनात आशा घेऊन
कधीच निजून गेलेली असतात.
आणि पुढल्या सकाळी,
पुन्हा एकदा,
पप्पांचा पगार झाला की घेऊ.....🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ 💔
#मध्यमवर्ग

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..