पार्टनर

हो., मला माहित आहे की
तू आता एका मुलाची आई आहेस. पण तरीही
इतक्या वर्षात कधीच आपलं जरासं ही बोलणं नसताना,
तुझ्या घराच्या वळणावर नेहमीच उभ्या असणा-या,
या वेड्याला तू आठवणीत जपलसं,
याच मला नेहमीच खूप अप्रूप वाटतं.
आणि जेव्हा तुला हे कळालं की,
माझ्या आयुष्यात खूपच problems सुरू आहेत,
नेमकं तेव्हाच तुझ्या मैत्रीची साथ मला मिळणं,
म्हणजे माझ्यासाठी काय आहे, हे तर मी तुला
शब्दांत कधीच सांगू शकणार नाही.
कारण मला खात्री आहे की,
तुला आत्तापर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल की,
तू माझ्यासाठी किती महत्वाची होतीस
आणि अजूनही आहेस.
तुला हसू येईल कदाचित,
आणि मी वेगळी वाट पकडतोय असंही वाटेल,
पण त्यादिवशी आपण बालाजी मंदिरात भेटलो ना,
तिथं पहिल्यांदाच इतक्या जवळून तुला पाहताना,
तुझ्याशी बोलताना, आणि नंतर मंदिरात
तुझ्या मागे मागे फिरताना तर आपण सप्तपदी चालतोय,
आणि देवाला एक प्रदक्षिणा घातली ना,
तेव्हा आपण सात फेरे पुर्ण केले
असं समजून तेव्हापासूनच,
मी तुला मनापासून माझी बायको मानलं आहे,
आणि मनातल्या मनात तुझ्याशी संसार ही सुरू केलाय.
खरंतर तेव्हापासूनच तू आणि मी वेगवेगळे राहतोय,
असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटतही नाही.
त्यामुळे तुझं सुखदुःख, अडीअडचणी काहीही असो,
त्यात मी स्वतःला तुझा हक्काचा #पार्टनर समजतो.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#गंध_आठवणींचा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..