परीकथेतल्या परीसारखी ती

एकतर्फी असलं तरीही, मी तिला पुर्णपणे कधी विसरूच शकलो नाही. बालपण हे एखाद्या परिकथेतील स्वप्नासारखं असतं. आणि त्या परिकथेतील परी, हेच जर आपलं स्वप्नं असेल, तर मग ते स्वप्नं विसरायचं तरी कसं.? माझ्या लग्नाच्या दिवशी तर माझं मलाच खूप नवल वाटत होतं, आणि माझ्या अवस्थेवर हसूही येत होतं की, मी असा कसा इतका माझ्या मनाविरुद्ध वागू शकतो. पण बहुतेक नियती पुढे हरलेला माणूस सुख-दुःखाच्या या अवस्थेला ओलांडून, खूप पुढे निघून गेलेला असतो. लग्नाच्या मंडपात उभा राहिल्यापासून, ते संसाराचा पहिला दिवस सुरू करेपर्यंत, आणि त्यानंतर ही प्रत्येक दिवस, मी माझ्या बायकोमध्ये तिला शोधायचा प्रयत्न करायचो. आणि कधी काळी स्वप्नात जपलेला एखादा क्षण, मी तिच्या सोबत साजरा करण्याचा प्रयत्न करायचो. पण कसं काय कुणास ठाऊक, तिला त्या गोष्टींचं कधीच विषेश असं काही कौतुकचं वाटलं नाही. काही घडलच नाही, या आविर्भावात, ती अगदी तशीच आपल्या कामात मग्न रहायची. मग हसरा चेहरा घेऊन, निराश मनाने मी हळूच तिच्यापासून लांब व्हायचो, आणि अंगणात येऊन, ओट्यावर बसून जुन्या आठवणीत हरवून जायचो.! 🎭

#आयुष्य_वगैरे 

#गंध_आठवणींचा

#काल्पनिक_वगैरे  

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..