तुझं नांव... 🌼🌼🌼

एक #पत्र पाठवलंय तुला. 

खरंतर ते पत्र नाहीच गं, तो मी आहे. 

त्यात नेमकं काय लिहावं, 

ते काहीच सुचत नव्हतं. 

खूप विचार करताना सहज जाणवलं की, 

मी जे बाहेर शोधतो आहे, ते खरंतर खूप आधीपासूनच,

माझ्या आतमध्ये खूप खोलवर दडून बसले आहे, 

ते म्हणजे तुझं नांव.! 

मग ज्या एका नावानं आपलं #आयुष्य व्यापलं आहे,

त्याबद्दल आणखी काय लिहायचं.!? 

खरंतर जिथं मी तुला #आयुष्य म्हणतो, आयुष्य मानतो,

तिथेच विषय संपला ना. 

म्हणून मग त्या पत्राच्या शेवटी, 

अगदी खालच्या बाजूला, 

फक्त तुझं नावच लिहून पाठवलं आहे.! 🎭

#आयुष्य_वगैरे 

#वेड 🌼🌼🌼

#गंध_आठवणींचा 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..