खुशबू 🌼🌼🌼
तू जितक्या सहजतेने माझ्या आयुष्यात आली होतीस ना, तितक्याच सहजतेने, तुझं माझ्या आयुष्यात येणं मला स्वीकारता आलं नाही गं.! ते तुझं येणंही फक्त निमित्तमात्र, म्हणजे formality नावाचे सोपस्कार पार पाडण्यासारखं होतं, हे खूप खूप उशीराने माझ्या लक्षात यावं, हे बाकी माझं आणखी एक दुर्देवच म्हणावं लागेल.! हे जेव्हा लक्षात आलं ना, तेव्हाच मला श्रावणातील पावसाचा खरा अर्थ उमगला गं.!
या मध्यंतरीच्या इतक्या वर्षात जेव्हा आपलं तीळमात्र ही बोलणं होत नसायचं, आणि त्याआधीही कधी झालेलचं नव्हतं, या काळात ऐनकेन प्रकारे एखादा पाऊस तुझ्या वाट्याला नक्कीच आला असेल गं. पण मी मात्र नेहमीच तुझ्या पावसाच्या प्रतीक्षेत, त्याच त्याच वळणावर, पुन्हा पुन्हा उभा राहिलो. मग इतक्या वर्षांनी, जवळपास निम्मं आयुष्य संपल्यावर, जेव्हा माझा हक्काचा पाऊस स्वतःहून माझ्याकडे आला, तेव्हा मी वेडसर वाटणार नाही, वागणार नाही, असं कसं होईल गं. पण माझं #वेड तुला ना तेव्हा समजलं होतं ,ना आत्ता.! 🎭
#आयुष्य_वगैरे
#गोष्ट_वेडेपणाची