वास्तू तथास्तु..
मिस्टर, आठवतंय का हो.?
मी तुम्हाला नेहमीच सांगायचे की, शुभ शुभ बोला हो.
उगाच चेष्टा मस्करीत ही असं वाईट वंगाळ बोलत जाऊ नका हो. पण तुम्ही माझं ते बोलणं कधीच गांभीर्याने घेत नसायचा. मिस्टर, वास्तू तथास्तु म्हणत असते हो. कित्ती वेळा समजावलं मी तुम्हाला, पण तुमचं आपलं नेहमीप्रमाणे एकच वाक्य, माणसाचे विचार हेच त्याचा वर्तमान असतात, व हे विचारच त्याचा भविष्यकाळ घडवत असतात. मिस्टर, तुम्ही अगदी सहजपणे बोलून गेलेल्या गोष्टी कित्ती पटापट घडत गेल्या हो. बहुतेक आत्तातरी तुम्हाला ही पटल असेलच की, वास्तू तथास्तु म्हणत असते.!🎭
#अडगळ
#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔