टपाल

बाळा, ऐक माझं. 

उगाच जीवाला लावून घेऊ नकोस.

आठवतंय काय? एकदा तूच तर म्हणाला होतास की, 

"खरंतर पत्रांचीच दुनिया बरी होती,

भावनांची जाण तेव्हा खरी होती.!"

कधी कधी आपले फक्त शब्दच पोहोचतात रे,

पण त्या शब्दांमागची भावना पोहोचायची मात्र राहूनच जाते.!

बाळा, Text message पाठवत असताना 

आपल्या रडण्याला काहीच अर्थ नसतो.‌‌ 

कारण फक्त मेसेजच send होतो, 

आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पडलेला अश्रूंचा थेंब, 

तिथल्या तिथेच आपल्या नजरेसमोर हरवून जातो.!🎭

#आई_म्हणे 

#आयुष्य_वगैरे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..