कुलूप
बाळा, ऐक माझं. तू पुन्हा चुकतो आहेस.
अरे, दरवाजा ठोठावण्याआधी आत कुणी आहे की नाही,
निदान याची तरी खात्री करून घ्यायची रे.
तू कधी पासून दरवाजा ठोठावतो आहेस,
पण दरवाज्याला लावलेलं भलं मोठं कुलूप
तू का बरं दुर्लक्षित करतो आहेस.?
आपण डोळे मिटले म्हणून
सा-या जगात अंधार पसरत नाही रे.
तो फक्त आपल्यापुरताच मर्यादित असतो.
अगदी तसंच जे त्रिकालाबाधित सत्य आहे,
तिकडं तू कितीही कानाडोळा केलास तरीही
परिस्थिती आहे तीच राहणार आहे.
जे आडात नाही ते पोह-यात कसं काय येईल.?
बाळा, शहाणा हो, डोळसपणे बघ.!🎭
#आई_म्हणे
#आयुष्य_वगैरे