प्रारब्ध वगैरे
"बाबुमोशाय,
जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है.
उसे ना तो आप बदल सकते है, ना मैं.
हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है,
जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है.
कब, कौन, कैसे उठेगा? ये कोई नहीं बता सकता."
राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटातील
फक्त एका डायलॉग मध्ये आपलं जगणं मरणं
सगळं काही सामावलं आहे, आणि आपण
कसं जगलं पाहिजे, हे सुद्धा सांगितलं आहे.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आधीपासूनच प्लॅनड असतो. तो क्षण कधी आपल्याला मनासारखा वाटतो, तर कधी मनाविरुद्ध.
मग याला अनुसरून चांगलं वाईट काहीही घडलं की
अशा प्रत्येक वेळी आपण नशीबालाच जबाबदार धरत असतो. पण खरंतर हा आपला प्रारब्ध आहे,
हे आपल्या लक्षातच येत नसतं. पहा विचार करून,
एखाद्याचा अचानक अकाली मृत्यू झाला की आपल्या जीवाला चटका बसून जातो, तर कधी कुणी, साधी ओळखपाळख नसतानाही, आपल्याला जीव लावून, आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून जातो. हे असं सगळं चांगलं वाईट उगाचच तर घडत नाही. बरोबर ना.? कुठल्यातरी जन्मातलं देणं घेणं लागत असावं आपलं त्यांच्याशी कदाचित.!🎭
#आयुष्य_वगैरे