मी... की आणखी कुणी.??

मिस्टर, आठवतंय काय हो तुम्हाला.?कधी कधी तुम्ही ना उगाचच मला प्रेमळ हाका मारत असायचा. त्यावेळी मी किचनमध्ये वगैरे किंवा इतर किरकोळ कामात मग्न असायचे. 

हो.. आले आले., मी असा प्रतिसाद दिला, तरीही तुमचं ते एकसारखं हाका मारणं सुरुच असायचं. मग नाईलाजाने मी माझं ते हातातलं काम टाकून, तुमच्यासमोर येऊन उभी रहायचे. त्यावेळी हां, बोला.. काय काम आहे हो मिस्टर.? 

माझ्या या प्रश्नाला तुमच्याकडे नेहमीप्रमाणेच काहीच उत्तर नसायचं. तुम्ही फक्त माझ्याकडे एकटक पाहत रहायचा, आणि काही वेळाने म्हणायचा की, काही नाही गं, सहज हाक मारत होतो. मग आपला काही वेळ तसाच हसण्यात निघून जायचा, आणि आपण पुन्हा आपापल्या कामात मग्न व्हायचो.! पण त्यावेळी मी तुमच्या समोरून निघून आले, तरीही मनाने तिथेच उभी असायची. कारण अशावेळी मला नेहमीच वाटून जायचं की, तुमच्या समोर तर मी उभी आहे, पण तुमची नजर मात्र काहीतरी वेगळंच शोधते आहे. ते नेमकं काय.!? हे मात्र मला‌ अजूनही उमगलं नाही. 🎭

#Miss_You_मिस्टर 

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..