जन्म बाईचा..
ताई किती द्विधा मनःस्थितीत असते. माहेरी आली की सासरच्या आठवणीत हरवते, आणि सासरी गेली की माहेरच्या आठवणीत हरवते. आता तर अगदीच चुटकीसरशी संपर्क करायची साधनेही उपलब्ध आहेतच, ऑडियो/व्हिडिओ कॉल, मेसेजेस वगैरे. पण तरीही ताईची होत असलेली तगमग बघवत नाही. अशावेळी का कुणास ठाऊक पण अचानक आई/आत्या वगैरे यांचा विचार मनात डोकावून जातो. कारण तेव्हा तर लग्नानंतर जास्त प्रमाणात माहेरी येणं जाणंही होत नसायचं, आणि फोन वगैरे तर खूप लांबची गोष्ट. वर्षातून एक दोन वेळाच आई तिच्या माहेरी जायची, तेसुद्धा एखादा सणवार किंवा इतर एखाद्या सुखदुःखाच्या प्रसंगाच्या निमित्ताने. मग कधीतरी, अगदी रखरखत्या उन्हात, दुपारच्या वेळी पोस्टमन एखादं टपाल घेऊन यायचा, तोच काय तो आईसाठी अचानक आलेला एखादा दसरा दिवाळी असायचा. आईचे वडील तर खूप आधीच वारलेले. आता तर आईची आईही नाही, मोठा/लहान भाऊ वगैरेही कुणी नाही. आईला काहीच वाटत नसेल काय.? आईला तिच्या आईवडिलांची, भावंडांची आठवण येत नसेल काय.? 🎭
#अडगळ
#प्रेम_आई
#आयुष्य_वगैरे