पत्रास कारण की...
प्रिय 🌼🌼🌼,
पत्रास कारण की, थेट बोलायची माझ्यात हिम्मत नाही.
आज १४ मे २०२४.
आज तू माझ्याशी बोलून ३ वर्षे पूर्ण झाली.
Happy Anniversary.!
तू अगदी बरोबर आहेस, चूक माझीच आहे, आणि मी तुझ्या आयुष्यात नसणं हेच तुझ्यासाठी चांगलं आहे. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात आनंदाचे कमी आणि मनस्तापाचे क्षणच जास्त येत आहेत. तू वैतागली आहेस, आणि तसं तू बोलून ही दाखवलं आहेस की, माझ्यासंग बोलून तुझी चूक तर झाली नाही ना.? याचं कारण माझं चुकीचं वागणं, अवास्तव अपेक्षा.! खरंतर तुझ्यासारख्या इतक्या सुंदर, सुशिल आणि गुणी मुलीवर प्रेम करण्याची, आजन्म प्रेम करतच राहण्याची माझी लायकीच नाही. तू कुठं आणि मी कुठं? जास्त काही बोलण्यात अर्थ नाही आता, कारण तू नेहमीच मला माझ्या लायकीत ठेवलं आहेस. आठवतंय का? १४ मे २०२१ आजच्याच दिवशी तू माझ्याकडे आली होतीस, मी नाही. ते सुद्धा तू formality म्हणून sorry म्हणायला आली होतीस, मी उगाचच गुंतून पडलो. चुकलंच माझं. तुला फक्त sorry म्हणून निघून जायचं होतं, पण मीच लांबड लावली. पहिलं एक वर्षभर तुला सगळं काही चांगलं वाटलं गं, पण हळूहळू माझ्या वागण्या बोलण्याला तू वैतागलीस. मीच मुर्ख, नंतर तू इतकं दुर्लक्ष करूनही मला शहाणपण आलं नाही. ज्याला आपण स्वतःच जवळ केलंय त्याला दूर करायचं तरी कसं.? म्हणून माझा सगळा मुर्खपणा दुर्लक्षित करून तू उगाच आपली ओढून ताणून नातं निभावते आहेस. तू कधीच सोडलं आहेस गं, पण मीच आशा लावून बसलो होतो, हे ही चुकलंच ना माझं. तू कधी कुणाला दूर करत नाहीस, नातं स्वतःहून तोडत नाहीस, कुणी समोरच्या दारातून हाकलून लावलं तर मागल्या दारातून पुन्हा हट्टाने आत येऊन बसतेस, असं तू म्हणतेस. पण आता खूप झालं ना, तुला आणखी मनस्ताप नको. मुर्ख, वेडा, कपटी, स्वार्थी, नालायक, हलकट, माणूसघाणा, नाटकी, प्रेम तर दूरच, पण मैत्रीच्या लायकीचा ही नसलेला. यातलं तुला मला काय समजायचं ते समज आणि मला कायमचं block कर, कारण काही केल्या मला तुला block करणं जमायचं नाही. तुला माझ्या प्रेमाची कदर नसली तरीही माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि आजन्म राहील. आजवर आठवणीत जगलोय, इथून पुढेही जगेणच. I Promise.. या तीन वर्षांत आपल्यात असलेलं नातं कायम माझ्यापुरतंच गुपित राहिल.! काळजी घे..🙏