पार्टनर..
बाळा., एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव.
जिथं आपल्या हाताची बोटं एकसारखी नाहीत,
तिथं आपल्याला माणसं तरी एकसारखी कशी काय भेटतील रे.?
जो तो सर्वात आधी आपला स्वार्थ आणि सोय पाहत असतो.
आपण चांगले आहोत, चांगलं वागत आहोत,
म्हणून चांगलीच माणसं आपल्या वाट्याला येतील,
आपल्यासोबत चांगलंच होईल, असं नसतं रे.
आपण घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत
आपल्याला फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीची सोबत असते,
जी आपल्याला नीट जाणते, समजते.
ती व्यक्ती म्हणजे आपण स्वत:च.!
बाळा, आपल्याला आपल्याइतकं कुणीही समजून घेऊ शकत नाही.
सगळे नुसतं नावालाच सोबत असतात. या अशा
दिखावा करणा-यांच्या घोळक्यात खोटं खोटं रमण्यापेक्षा,
आपला खराखुरा असा एकांतच बरा ना.
बाळा, जितक्या अपेक्षा जास्त,
अपेक्षाभंगाचं दुःखही तितकंच मोठ्ठं असतं रे.!🎭
#आई_म्हणे
#आयुष्य_वगैरे