आसू आणि हसू 🎭
आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवशी आपली कोर्टातील ती शेवटची तारीख होती. काही वर्षे का असेना, पण आपण सुखदुःखाचे क्षण एकत्र जगलेले होते. अशा ब-याच कडू गोड क्षणांची मी तिथं उजळणी करत बसलो होतो. त्यावेळी कधी अचानक मला खूप हसू यायचं, तर कधी आतल्या आत माझं मन हंबरडा फोडून रडायचं. पण सहज तुझ्याकडे नजर गेली की, मी सगळं काही विसरून जायचो. आणि तेव्हा वाटायचं की हिला काहीच कसं काय वाटत नाहीये? इतक्या वर्षांचा आपला संसार आज शेवटच्या घटका मोजत असतानाही, ही बाई इतकी निर्विकार आणि हसतमुख कशी काय असू शकते? तो दिवस आणि त्यानंरचे काही दिवस असेच निघून गेले, पण त्या तुझ्या हसण्याचं गूढ मला काही केल्या अजूनही सुटत नव्हतं. आपले नंबर एकमेकांकडे सेव्ह असूनही मध्यंतरी बरीच वर्षे आपलं कसल्याही प्रकारचं बोलणं, वा साधा मेसेज ही नव्हता. तरीही एकदा तरी शेवटचं भेटावं आणि बोलावं म्हणून मी तुला आज इथं भेटायला बोलावलं आहे. मी - (तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत) अगं, कशी आहेस.? ती - (माझ्याकडे न बघताच) कशाला बोलाव...