शोध सुखाचा...
इथं चुकीला माफी नाही राजा. हे कलियुग आहे. इथं karma अगदी instantly फिरून येतो. मान्य आहे की, आता वेळ निघून गेलेली आहे. पण आई वडील म्हणून आम्ही सुद्धा आयुष्याला पुरलेलो नाही रे. वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक ना एक दिवस आम्ही सुद्धा अचानक निघून जाऊच. तेव्हा आमच्या आठवणीत तू असाच कुढत जगणार आहेस काय.? आणि असं आमच्यामुळे, आमच्या काळजाच्या तुकड्याला झालेला त्रास आम्हाला आवडेल काय.? बाळा, आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे एखाद्या स्टेशन प्रमाणे आहे. जिथं माणूस नावाच्या ट्रेन्स येत जात राहतात. आणि कुठलीही ट्रेन कधीही कायमस्वरूपी मुक्कामासाठी येतच नाही. आज ना उद्या, कधी ना कधी तिला जायचचं असतं. बाळा, येणा-या जाणाऱ्या ट्रेन्सच्या announcement च्या आठवणींच्या गर्दीत हरवलेलं हे स्टेशन, दिवसातला कित्तीतरी वेळ एकटं, रिकामचं असतं रे. म्हणून सांगतेय बाळा, काही गोष्टी जागच्या जागीच सोडून दिलेल्या ब-या असतात. मग त्या गोष्टी आपल्याला सुखावणा-या असतो वा दुखावणा-या.! बाळा, तू म्हणतोस त्याप्रमाणे नसणं वेगळं आणि असून नसणं वेगळं.! पण कधीतरी त्यापुढेही जाऊन विचार कर ना. असण्या नसण्या पलीकडे जाऊन, जे आहे ते जपणं खूप महत्त्वाचं आहे रे. आता अशा गोष्टींकडे तू तुझं लक्ष केंद्रित करायला हवं. हे कलियुग आहे, आणि इथं नेहमीच यंत्राच्या सानिध्यात राहून माणूस ही यंत्रवत बनत चाललाय. बाळा, या गर्दीत ना, तू तुझ्यासारखी माणसं शोध, जी नेहमीच विनाअट तुझ्यासाठी हजर आहेत, त्यांना जप. आणि तू सुध्दा नेहमीच त्यांच्यासाठी विनाअट हजर रहा. बाळा, जीव द्यायला एक कारण पुरेसं वाटतं आहे ना तुला. मग माझी एक गोष्ट ऐक, जगण्याची कारणं शोध. मला खात्री आहे की तू मरणं कायमस्वरूपी विसरून जाशील, आणि जेव्हा कधी मरण येईल, तेव्हा अगदी हसतमुखाने त्याला सामोरं जाशील.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ 💔