एका गोष्टीचा अंत..
आधीच खूप साऱ्या अधु-या गोष्टींनी भरून गेलेला मी, त्यात आता त्याचं ते मरण म्हणजे आणखी एक अधुरी गोष्ट.! त्याचं ते तसं जाणं म्हणजे त्याच्या गोष्टीचा अंत आहे की आरंभ.? हेच मला कळत नाहीये. आता तर असं वाटू लागलं आहे की पुर्ण, पुर्णत्व असं काही नसतंच बहुतेक. जन्म-मरण म्हणजे एक अविरतपणे सुरू असलेलं चक्र आणि आपण चिखलाचे गोळे. त्यावर स्वार होऊन, स्वतःला आकार देत पळत रहायचं. तोल सांभाळत पळत राहणं, म्हणजेच जगणं. आणि तोल गेला, आपण खाली पडलो की मरण. मग पुन्हा माती, पुन्हा चिखल, पुन्हा गोळा, पुन्हा चाकावर स्वार व्हायचं वगैरे वगैरे.! पण चक्र कधीच कुणासाठी थांबलं नाही, थांबत ही नाही.! खूपशा गोष्टींचा शोध घ्यावा, असं वाटत आहे. पण भूतकाळ, मग तो कोणाचाही असो, एखाद्या कृष्णविवरासारखा असतो. एकदा का त्या विश्वात गेलं आणि रमलं की, आपण कायमचेच त्या विश्वाचे होऊन जातो.
#आई_म्हणे ते अगदी बरोबर आहे, काही प्रश्नांची उत्तरं ही न शोधलेलीच बरी असतात.!🎭
#आयुष्य_वगैरे
#अडगळ 💔