आरसा

आपलं चांगलं दिसणं किती महत्वाचं आहे, याचा प्रत्यय मला काल पुन्हा एकदा आला, जेव्हा मी एका छोट्याशा बस प्रवासात चोर ठरता ठरता वाचलो. तसा किरकोळ प्रसंग.! बसमध्ये माझ्या समोर उभ्या असलेल्या बाईंच्या बॅकपॅकची झिप, त्या बसमध्ये आल्यापासूनच उघडी होती.थोड्या वेळाने अचानकच त्यांनी ती पाहिली, आणि ओरडा सुरू केला की, माझ्या बॅगची झिप कुणी उघडली.? क्षणार्धात आजूबाजूच्या सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळल्या, कारण त्यांच्या अगदी बरोब्बर मागील बाजूस मीच उभा होतो. आणि माझा अवतार पाहून लागलीच आजूबाजूच्या सर्वांच्या नजरेनं मला चोर घोषित केलं ही.! मी काहीच न बोलता तिथून थोडा लांब सरकलो. त्यानंतर बराच वेळ त्या बाईंची ती बॅकपॅक तपासणी सुरूचं होतं. तपासणीअंती त्यांनी हा निष्कर्ष काढला की, त्यातून काहीच चोरीला गेलेलं नाहीये, आणि बहुतेक त्यांच्याकडूनच घाईगडबडीत झिप लावायचं राहून गेलं आहे. क्षणार्धात वातावरण नॉर्मल झालं. त्या बाईंच्या आजूबाजूची सगळी मंडळी हसायला लागली. काही वेळापूर्वी तिथं hotspot असलेला मी, आता कुणाच्या खिजगणतीतही नव्हतो. पण तरीही त्या गर्दीची काही वेळापूर्वीची 'हाच बहुतेक चोर' ही नजर मला खूप सतावत होती. तेव्हा मला अचानक माझ्या आईचं एक वाक्य आठवून गेलं. बाळा, जरा नीट टापटीप राहत जा. हे कलियुग आहे. इथं आपण फक्त चांगलं असून उपयोग नाही, तर आपण चांगलं दिसलं ही पाहिजे. कारण इथं 'वरलिया रंगा' भुलणारी मंडळी पावलोपावली गाठ पडतात.!🎭

#आई_म्हणे #आयुष्य_वगैरे #अडगळ 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..