नाही कुणाचे कुणी..
बाळा, ऐक माझं. हे social media वगैरे सगळं थोतांड आहे. ही तर फक्त एखाद्या आभासी जगात क्षणभर आपलं मन रमवायची साधनं. ही सगळी कलियुगाची माया आहे राजा. म्हणूनच तर माणूस जितीजागती माणसं सोडून यंत्राच्या नादी लागला आहे, त्यांनाच सर्वस्व समजू लागला आहे. बाळा, शेवटी सगळं काही वैयक्तीक स्वार्थापाशी येऊन थांबतं. आणि एक गोष्ट लक्षात घे, ज्यांना आपल्या सदेह अस्तित्वाचं कौतुक नाही, त्यांना या virtual विश्वात आपल्या असण्या नसण्याने फरक तरी काय पडणार.? राजा, म्हणून इथं जास्त गुंतू नकोस, फुलपाखरासारखा राहायचा प्रयत्न कर. ते नक्कीच जमेल तुला.!🎭
#आई_म्हणे
#आयुष्य_वगैरे
#अडगळ 💔