किंमत

"सर, त्यादिवशी तिला तसं आनंदीत पाहून माझं मलाच काही कळत नव्हतं. सरतेशेवटी सगळं काही तिच्या मनासारखं झालं होतं. म्हणून रागारागाने मी तिच्या गळ्यातील माझ्या नावाचं मंगळसूत्र मागून घेण्याच्या विचारात होतो. पण तितक्यात माझ्या मनाला वाटून गेलं की, ज्याच्याकडे जी गोष्ट असते, त्याला त्या गोष्टीची किंमत नसते. आणि यात नवल असं काही नव्हतंच. जे तिच्या नशिबातच नव्हतं, ते तिला मिळालं होतं. पण हे सारं बहुतेक विधिलिखित होतं, आणि तेच घडलं.!"

कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यापासून आमची अजून एकदाही भेट झाली नाही. पण आम्हा दोघांचं झालेलं हे शेवटचं बोलणं मला अजूनही आठवत आहे. त्यादिवशी त्याचा मूड नेमका कसा होता? ते मला काहीच कळलं नव्हतं. कधी रागीट, कधी आनंदी, कधी चिंताक्रांत, तर कधी निराश.‌ क्षणभरासाठी तर मला तो मनोरुग्ण वाटला, पण त्याची मनस्थिती बहुतेक फक्त तोच समजू शकत होता. ते म्हणतात ना, ज्याचं जळतं, त्यालाच कळतं.!

#आयुष्य_वगैरे 

#अडगळ 

#गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..