गोष्टीचं शेवटचं पान..

आता तो ही संपला, आणि बहुतेक त्याची गोष्ट ही.! म्हणून त्याच्या एकेक जुन्या आठवणी पुसत असताना हा मेसेज मला दिसला. माझ्यासाठी हे त्याच्या गोष्टीचं शेवटचं पान..

त्याचा हा text message ब-याच दिवसांपासून inbox मध्ये पडून होता, तो असा..

"का कुणास ठाऊक आधीच कधी कधी रात्री खूप खूप उशीरापर्यंत झोप येत नाही. पंखा, पडदा, खिडकी, छत, भिंती यांचेकडे पाहत जागत राहतो. चादरीला कडकडून मिठी मारतो, तेव्हा कुठे थोडं हायसं वाटतं. आणि आता आजकाल प्रत्येक दिवसाची सुरुवात ही रडण्यानेच होत आहे.‌ सकाळी डोळे उघडताच जाणवणारा एकटेपणा अगदी जीवघेणा वाटतो. कधी आणखी एक दिवस मागे पडला याच सुख वाटतं, तर कधी आणखी किती दिवस बाकी हा विचार छळतो. याआधीही देवाकडे खूप काही मागितलं आहे, पण त्यानं काहीच दिलं नाही. आता तर मरण मागूनही दमलो आहे, पण तेसुद्धा काही केल्या मिळत नाहीये. खरंच सांगतोय, आत्महत्या करायची हिम्मत नाहीये ओ. पण आता एक कळून चुकलयं की, देवाकडे मागून काहीच मिळत नाही. तो नाहीच मुळी. आपल्या मनाच्या समाधानासाठी, हवं तसं जगण्यासाठी, आणि देवाधर्माच्या नावाखाली सगळं काही पचवण्यासाठी या जागा आपण स्वतःच तयार केल्या आहेत. कधी कधी तर त्या देवाकडे पाहून मनात विचार येऊन जातो की, बिच्चारा हा सुद्धा दिवसातला कित्तीतरी वेळ एकटाच असतो, त्या गाभाऱ्यात कोंडलेला.! आपल्या श्वासाचं ही असंच काहीसं झालं आहे बहुतेक. त्याला देह नावाचा पिंजऱ्यात कोंडलयं. हो पिंजराच. कारण आजकाल माणूस आणि माणूसकी उरलीय कुठे.!? 🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..