मनातलं महाभारत
बाळा, आपण कुणाच्या सोबतीत राहतो, तो कुणाशी कसा वागतो, त्याची विचार करण्याची पध्दत काय आहे, हे सगळं ही खूप महत्त्वाचं असतं. तो जर अप्रत्यक्षपणे आपल्यावर त्याची विचारसरणी लादत असेल आणि आपणही डोळे झाकून ती स्वीकारत असू तर हे खूप भयंकर आहे. कारण आपण जर वाट दाखविणाराच चुकीचा निवडला, तर आपली वाट लागणारच ना.! बाळा, नीट विचार करून पहा, कधी काळी हे निर्णय आपणच तर घेतलेले असतात, ही माणसं आपणच तर स्वीकारलेली असतात. पण काळाची पावलं ओळखून आपण वेळीच सावध न झाल्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर ओढावलेली असते. बाळा, योग्य वेळी योग्य ते शहाणपण येणं खूप गरजेचं आहे. कारण त्यानंतर येणारं शहाणपण हे फक्त जीवघेणा पश्चात्ताप सोबतीला घेऊन येत असतं.!🎭
#आई_म्हणे #आयुष्य_वगैरे #अडगळ 💔