तहान

        घरी कुणी वाट पाहणारं नसतं त्यांच्यासाठी कामावरून घरी परतताना वाटेत लागणा-या काही जागा या अगदी घरच्यासारख्या झालेल्या असतात. म्हणूनच काम सुटलं की पावलं आपसूकच इकडं वळतात. या जागा प्रत्येकासाठी तशा वेगवेगळ्या असतात, पण हक्काच्या, आपल्या वाटणा-या अशा असतात. 

        एखाद्या वळणावरचा एखादा विशाल वृक्ष, एखादं चहाचं खोकं, पानाची टपरी, एखादा मोडकातोडका बाक, एखादं छोटं हॉटेल वगैरे वगैरे. तिथला चहावाला पो-या असो वा फडकं मारणारा काका, कौंटरवरचा मालक असो वा बाहेर भांडी धुणारी मावशी, सगळी कशी आपली वाटत असतात. तिथं कधी कधी ही मंडळी दिसली नाहीत की आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, तर तिथं नेहमीच जाणारे आपण एखादा दिवस नाही गेलो तर पुढल्या दिवशी हमखास ठरलेला प्रश्न.. काल कुठे गायब होता.? आला नाहीत चहाला वगैरे.! 

        नातीगोती हरवलेली ही दिवसभर भटकत राहणारी माणसं, या अशा छोट्या जागेत, छोट्याशा प्रसंगात आपलं हरवलेलं आयुष्य शोधत जगत असतात, आणि त्यांची आपलेपणाची तहान भागवत असतात. आणि तसंही घरी परतल्यावर तो सवयीचा एकांत वाट पाहत उभा असतोच ना.!🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ #गोष्ट_छोटीशी_डोंगराएवढी 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..