वेळ... चांगली वाईट.!

त्यांचं घर तसं गावात खूप नावाजलेलं, पण एकदा का वाईट वेळ सुरू झाली की मग त्यापुढे कुणाचेही काहीच चालत नाही. मुलं बाळं लहान होती तोवर ठीक होतं, पण घरातलं नेमकं मोठ्ठं पोरगचं वाईट संगतीला लागलं आणि त्या घराची पार रया गेली. मोठ्या लेकराला सावरण्यात बापानं सगळी संपत्ती, ताकद पणाला लावली. पण त्या पोराची व्यसनं आणि वाईट संगत काही केल्या सुटली नाही. एकुलती एक मुलगी तशी सुखाने नांदत होती, हेच काय ते एकमेव सुख. या सगळ्याला कंटाळून सगळ्यात लहान मुलगा शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात कामाला लागला होता, गेल्या वर्षभरापासून आयुष्याची गाडी सुरळीत सुरू होती, पण तितक्यात त्या लहान मुलाचाही कामावरून घरी परतताना अपघाती मृत्यू व्हावा, हे त्या मायबापाचं दुर्दैवच. अंत्यविधीसाठी जेव्हा पुण्याहून त्याचं प्रेत त्याच्या गावी आणलं, तेव्हा सगळ्या गावकऱ्यांच्या तोंडी एकच चर्चा सुरू होती की, याच्या जागी देवानं त्याच्या मोठ्या भावाला उचललं असतं तर बरं झालं असतं, आणि मोठा भाऊ नेहमीप्रमाणेच फुल्ल टाईट होऊन कुठंतरी लोळत पडला होता.!🎭

#आयुष्य_वगैरे #गावाकडच्या_गोष्टी #अडगळ 💔

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..