ओव्हरटाईम

आठवड्यातून एखादी सुट्टी वगैरे ठीक आहे, पण हे सणवार वगैरे आले आणि एकमेकांना लागून भरपूर सुट्ट्या आल्या की घर खायला उठतं. ओव्हरटाईम म्हणून कामाच्या ठिकाणी ही जाऊन बसता येत नाही. कारण आपण जरी मोकळे असलो तरी बाकीच्यांना त्यांची कामं असतात. अशात आपण ओव्हरटाईम साठी ऑफिसात जाऊन बसलो की आपल्यामुळे एक दोन माणसं उगाचच अडकून पडतात. बाहेर भटकायचं तरी किती आणि कुठे कुठे.? भटकायला ही मर्यादा आणि आवडत्या ठिकाणांची यादीही फारच छोटी. आणि आपण नेमकं अशा आवडत्या ठिकाणी जावं तर पुन्हा तिथं जुन्या आठवणी आपली वाट पाहत कधीच्या ताटकळत उभ्या असतात. मग त्या आठवणींची केविलवाणी अवस्था ही बघवत नाही. म्हणून मग गुपचूप घरी राहणे, हाच पर्याय उत्तम वाटतो. पण आपण घरी असताना आणि दिवसाढवळ्या घराचा मुख्य दरवाजा बंद करूनही फार काळ बसता येत नाही. मग सतत आतबाहेर करत रहायचं. काहीतरी वाचायचा प्रयत्न करायचा, पुन्हा मोबाईल, पुन्हा काहीतरी खायचं, पुन्हा आतबाहेर करायचं, पांढ-याशुभ्र, निळ्याशार तर कधी एखाद्या काळ्याकुट्ट ढगांकडे पाहायचं,.! याच क्रमाने पुन्हा पुन्हा तेच तेच तेच., आणि गच्च कवटाळून घेणा-या गडद अंधाराची वाट पाहत रहायचं.!

कित्ती काय कसं मांडायचं.?

स्वतः स्वतःला कसं गाडायचं.?🎭

#आयुष्य_वगैरे #अडगळ 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..