आठवणींची खळखळ...
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. मी नुकताच कामावरून परतून फ्रेश होऊन हॉलमध्ये खुर्ची टाकून बसलो होतो. तितक्यात सहज माझी नजर किचनमध्ये गेली. आईची पाठमोरी आकृती माझ्या नजरेसमोर उभी होती. क्षणार्धात मन भूतकाळात हरवून गेलं. आईच्या काखेतून कधी आपण खाली आलो, रांगायला लागलो, नंतर धावायला लागलो, हे सगळं काही आठवू लागलं. आईकडे पाहत आईकडून आपण कित्ती काय काय शिकलो, हे सगळं काही आठवायला लागलं. तेवढ्यात अचानक घड्याळाकडे लक्ष गेलं आणि माझं मलाच हसू आलं. कारण घड्याळ पहायला ही आईनेच शिकवलं होतं. त्याचं व्हायचं असं की आई असायची किचनमध्ये आणि घड्याळ हॉलमध्ये. मग आई सांगायची, बाळं... मोठा काटा आणि लहान काटा कुठे आहे ते सांग बरं. आणि मग मला नेमकं किती वाजले आहेत ते कळायचं. ग म भ न पासून ते तिखट मीठाचा अंदाज, आणि अगदीच बारीक सारीक गोष्ट सांगायची झाली तर, लसूण अगदी पटकन कसा सोलायचा इथंपर्यंत, आणि आणखीन भरपूर भरपूर भरपूर काही.!🎭
#गंध_आठवणींचा #प्रेम_आई ❤️