न बोललेलं..

सुखात तर सगळेच एकमेकांची आठवण काढतात, पण आपण दुःखात असताना आपल्याला ज्यांची आठवण येते ना, ती माणसं आपल्यासाठी खूप खास असतात. तुझ्यासाठी मोबाईलच्या नेटवर्कप्रमाणे आहे ना मी, आहे पण आणि नाही पण.! तसं पहायला गेलं तर तुझ्या आयुष्यात माझं काहीच अस्तित्व नसतानाही, तू माझं अस्तित्व जपते आहेस. तुला माझी आठवण येणं, माझ्याशी बोलावंसं वाटणं, हे कित्ती भारी वाटत मला. हळूहळू किती आपलसं केलं आहेस तू मला, तरीही मी नेहमीच गोंधळलेला असतो की तुझ्याशी नेमकं कसं वागावं.!? कारण कितीही समजावलं तरी माझं मन प्रेमाची वाट सोडायला तयार नाही, आणि तुझं मन तर खूप खूप आधीपासूनच मैत्रीच्या वाटेवर मार्गस्थ.!🎭

#आयुष्य_वगैरे 🫂 #गंध_आठवणींचा ❤️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आसू आणि हसू 🎭

स्वामिनी..

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..