स्त्री
सकाळपासून विचार करतो आहे की, नेमक्या कशा आणि काय शुभेच्छा द्याव्यात. पण वेगळं असं काहीच सुचत नव्हतं. कारण तुझ्याबद्दल विचार करत असताना सभोवताली दुसरं काहीच दिसत नव्हतं. या बाजूला पहावं तर त्या बाजूने तू खुणावताना दिसायची. आणि त्या बाजूला पहावं तर विरूद्ध बाजूनेही तूच खुणावताना दिसायची. म्हणून मग विचार केला की, आपल्या आयुष्याचा कण कण आणि क्षणक्षण व्यापून टाकलेल्या व्यक्तीला आपण दुसरं आणखी द्यायचं तरी काय.? म्हणून मग दोन चार शब्दच लिहून पाठवूयात असं ठरलं. कारण त्यापलीकडे फक्त माझं असं माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये, म्हणून हा खटाटोप.!
माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आवडत्या आणि एकमेव स्त्री पात्रास (चिमणी सह) महिला दिनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा.!💐🍫🤝🙏😁