पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नशीब वगैरे..

प्रवास तसा दररोज ठरलेलाच, मग त्या निमित्ताने बस आणि बस स्टॉप यांच्याशी संबंध येतोच येतो. बरेच ओळखीचे चेहरे तिथं दररोज गाठ पडतात, तसं फार काही बोलणं होत नाही, पण किरकोळ नजरानजर आणि चला.., हमालीला जाऊयात, अशा किरकोळ शब्दांची देवाणघेवाण होते. ब-यापैकी मुख्य रस्ता आणि गजबजलेला चौक वगैरे म्हणून तिथं भटकी कुत्री, एखादं मोकाट जनावरं, दोन चार वृध्द दिव्यांग भिकारी वगैरे ही कायमचीच. तसंच तिथं ब-याचशा किन्नर लोकांचाही दररोजचा वावर. आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मोठ्या दुकानात थेट जायचं, त्यांच्या तोंडावरून मायेनं हात फिरवायचं, दुकानातल्या देवाच्या फोटोकडे पाहून, डोळे मिटून काहीतरी पुटपुटायचं, आणि दुकानदार हातात ठेवील ते पैसे घेऊन तिथून बाहेर पडायचं. अशावेळी त्यांचा मोर्चा अधेमध्ये बस स्टॉपकडेही यायचा. जवळपास सगळे तेच ते आणि ओळखीचे चेहरे म्हणून पटापट त्यांच्या हातात १०-२० च्या नोटा टेकवल्या जायच्या. किन्नरांच सर्वांच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवणं एकसारखं सुरूच असायचं. माझ्याजवळ आल्यावर मला खिजवण्यासाठी त्यांचा एक ठरलेला डायलॉग असायचा. ए पांढरी दाढी..‌ पैसे दे ना रे..! त्यानंतर एकमेकांकडे पाहत ते खूप...

खुशबू 🌼🌼🌼

तू जितक्या सहजतेने माझ्या आयुष्यात आली होतीस ना, तितक्याच सहजतेने, तुझं माझ्या आयुष्यात येणं मला स्वीकारता आलं नाही गं.! ते तुझं येणंही फक्त निमित्तमात्र, म्हणजे formality नावाचे सोपस्कार पार पाडण्यासारखं होतं, हे खूप खूप उशीराने माझ्या लक्षात यावं, हे बाकी माझं आणखी एक दुर्देवच म्हणावं लागेल.! हे जेव्हा लक्षात आलं ना, तेव्हाच मला श्रावणातील पावसाचा खरा अर्थ उमगला गं.!  या मध्यंतरीच्या इतक्या वर्षात जेव्हा आपलं तीळमात्र ही बोलणं होत नसायचं, आणि त्याआधीही कधी झालेलचं नव्हतं, या काळात ऐनकेन प्रकारे एखादा पाऊस तुझ्या वाट्याला नक्कीच आला असेल गं. पण मी मात्र नेहमीच तुझ्या पावसाच्या प्रतीक्षेत, त्याच त्याच वळणावर, पुन्हा पुन्हा उभा राहिलो. मग इतक्या वर्षांनी, जवळपास निम्मं आयुष्य संपल्यावर, जेव्हा माझा हक्काचा पाऊस स्वतःहून माझ्याकडे आला, तेव्हा मी वेडसर वाटणार नाही, वागणार नाही, असं कसं होईल गं. पण माझं #वेड तुला ना तेव्हा समजलं होतं ,ना आत्ता.! 🎭 #आयुष्य_वगैरे  #गोष्ट_वेडेपणाची 

तुझं नांव... 🌼🌼🌼

एक #पत्र पाठवलंय तुला.  खरंतर ते पत्र नाहीच गं, तो मी आहे.  त्यात नेमकं काय लिहावं,  ते काहीच सुचत नव्हतं.  खूप विचार करताना सहज जाणवलं की,  मी जे बाहेर शोधतो आहे, ते खरंतर खूप आधीपासूनच, माझ्या आतमध्ये खूप खोलवर दडून बसले आहे,  ते म्हणजे तुझं नांव.!  मग ज्या एका नावानं आपलं #आयुष्य व्यापलं आहे, त्याबद्दल आणखी काय लिहायचं.!?  खरंतर जिथं मी तुला #आयुष्य म्हणतो, आयुष्य मानतो, तिथेच विषय संपला ना.  म्हणून मग त्या पत्राच्या शेवटी,  अगदी खालच्या बाजूला,  फक्त तुझं नावच लिहून पाठवलं आहे.! 🎭 #आयुष्य_वगैरे  #वेड 🌼🌼🌼 #गंध_आठवणींचा 

Miss You मिस्टर...💔

मिस्टर, तुमचं एक वाक्य मला नेहमी आठवतं हो,  ''देवाधर्माच्या साक्षीनं, अगदी वाजत गाजत घरी आणलेल्या आपल्या हक्काच्या बायकोला जीव नाही लावायचा,  तिच्यावर सर्वस्व उधळून प्रेम नाही करायचं, तर मग कुणावर करायचं.?'' मिस्टर, आपलं तर अरेंज मॅरेज, तरीही मला नेहमीच हा प्रश्न सतावायचा की, तुम्ही मला इतका जीव का लावता.? माझ्यावर इतकं प्रेम का करता.? कारण अगदी लहानपणापासून अशा गोष्टी, मी फक्त टिव्ही मालिका आणि हिंदी-मराठी चित्रपट यातच पाहत आलीय. मिस्टर, आठवतंय काय हो तुम्हाला, कधी कधी तर आपले शेजारीपाजारी ही  सहज गंमतीने आपल्याला विचारायचे की, नक्की अरेंज मॅरेजच आहे ना तुमचं.? मिस्टर, तुम्ही इतकं प्रेम करत होता माझ्यावर, आणि ते सर्वांना दिसतही होतं. लग्नानंतर काही दिवस, महिने, किंवा फारतर एखादं वर्ष हे असंच सुरू राहील, असं मला वाटलं होतं. पण तुमचं माझ्यावरील प्रेम, आणि माझी काळजी घेण्याची तुमची सवय उत्तरोत्तर वाढतच गेली हो.! आपलं लग्न जुलैमध्ये झालं होतं, त्यामुळे माझ्या पहिल्या valentine's day साठी मला फारच वाट पहावी लागली. तसं याबद्दल मी तुम्हाला काहीही बोलले नव्हते, कारण तुम्हा...

डिसेंबर ०९, २०२१

कधी कधी वाटतं की माझा जन्म फक्त तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या आठवणीत जगण्यासाठीच झालाय. तुझ्यावर प्रेम करत असताना मी एवढा हरवून गेलो की, देवाकडे तुझ्यासाठी सतत काहीतरी मागता मागता, त्याच देवाकडे मी तुला मागायचं विसरून गेलो. पण तो देव ही शेवटी दगडाचाच निघाला. एवढा रडलो त्याच्यापाशी, पण कधीच त्याला मायेचा पाझर फुटला नाही. तुला नेहमी आनंदी अन् हसत खेळत पहायचं होतं. तुझी सारी स्वप्नं पुर्ण झालेली पहायची होती. मला नेहमी असं वाटायचं की, तुला तुझ्या मनासारखा जोडीदार मिळावा, पण त्या जोडीदाराच्या जागी तुझा नवरा म्हणून, मी स्वतःला पहायचं विसरूनच गेलो गं. 'तुझ्याशी लग्न.... हे स्वप्नं खरंतर मी खूप आधीपासूनच पहायला हवं होतं, पण तुझी engagement झाल्याची कळाली, तेव्हा मी खडबडून जागा झालो, आणि स्वप्नातून सत्यात आलो. तुझ्या मागं मागं फिरणं, नुसतं लपून छपून तुला पाहणं, यातच गुंतून पडलो. आणि तुझ्याशी कधीच बोलायची हिम्मतच न झाल्यामुळे, आता ही वेळ पाहत होतो. सतत तुझ्या घराशेजारी घुटमळत राहिलो, प्रत्येक वाटेवर उभा राहिलो, पण कधीच आणि काहीच बोललो नाही. फक्त नेहमीच तू माझ्या या डोळ्यांना दिसावी, ए...

परीकथेतल्या परीसारखी ती

एकतर्फी असलं तरीही, मी तिला पुर्णपणे कधी विसरूच शकलो नाही. बालपण हे एखाद्या परिकथेतील स्वप्नासारखं असतं. आणि त्या परिकथेतील परी, हेच जर आपलं स्वप्नं असेल, तर मग ते स्वप्नं विसरायचं तरी कसं.? माझ्या लग्नाच्या दिवशी तर माझं मलाच खूप नवल वाटत होतं, आणि माझ्या अवस्थेवर हसूही येत होतं की, मी असा कसा इतका माझ्या मनाविरुद्ध वागू शकतो. पण बहुतेक नियती पुढे हरलेला माणूस सुख-दुःखाच्या या अवस्थेला ओलांडून, खूप पुढे निघून गेलेला असतो. लग्नाच्या मंडपात उभा राहिल्यापासून, ते संसाराचा पहिला दिवस सुरू करेपर्यंत, आणि त्यानंतर ही प्रत्येक दिवस, मी माझ्या बायकोमध्ये तिला शोधायचा प्रयत्न करायचो. आणि कधी काळी स्वप्नात जपलेला एखादा क्षण, मी तिच्या सोबत साजरा करण्याचा प्रयत्न करायचो. पण कसं काय कुणास ठाऊक, तिला त्या गोष्टींचं कधीच विषेश असं काही कौतुकचं वाटलं नाही. काही घडलच नाही, या आविर्भावात, ती अगदी तशीच आपल्या कामात मग्न रहायची. मग हसरा चेहरा घेऊन, निराश मनाने मी हळूच तिच्यापासून लांब व्हायचो, आणि अंगणात येऊन, ओट्यावर बसून जुन्या आठवणीत हरवून जायचो.! 🎭 #आयुष्य_वगैरे  #गंध_आठवणींचा #काल्पनिक_वगैरे...