म्हातारपण
आपण लहान असताना आपल्या आईवडिलांनी एका क्षणासाठीही कधी आपल्याला त्यांच्या नजरेपासून दूर होऊ दिलं नव्हतं. पण आता त्यांच्या वृध्दापकाळात, ते जवळपास तशाच काहीशा अवस्थेत असताना, नाईलाजाने का असेना, पण आपल्याला त्यांना घरी एकटं सोडून जावं लागतं. अधेमध्ये एखादा फोन करून थोडीशी विचारपूस केली तरीही, जोपर्यंत संध्याकाळी घरी येऊन त्यांना प्रत्यक्ष पाहत नाही, तोपर्यंत जीवाला चैन पडत नाही. रात्रीचं जेवण आवरून त्यांच्या सोबत गप्पा मारत, त्यांच्याकडे पाहत बसल्यावर सहज वाटून जातं की, कसं काय कुणास ठाऊक, पण अलीकडे त्यांचा वृध्दत्वाकडे झुकत जाण्याचा वेग कमालीचा वाढला आहे. हालचालींचा मंदावलेला वेग, थरथरणारे हात, अगदी जवळच ठेवलेल्या एखाद्या गोष्टीचा अचानकपणे पडलेला विसर, प्रत्येक दिवसागणिक चेह-यावर वाढत जाणा-या सुरकुत्या, नेमकं काय हवं आहे याचा विसर पडलेली, पण इकडं तिकडं भिरभिरणारी त्यांची नजर आणि आणखी बरंच काही ते दोघे शांतपणे झोपी जाईपर्यंत पाहतच राहतो. त्यानंतर बराच वेळ, अगदी तसाच, तिथेच त्यांच्या बाजूला बसून राहतो.!🎭
#आईबाप #आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂