आत्मनिर्भर भारत...??
भारताच्या एकूण पेट्रोलियम गरजेपैकी सुमारे ८०-८५% तेल आयात केले जाते. अत्याधुनिक शस्त्रे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी भारत रशिया, इस्रायल, फ्रान्स आणि अमेरिकेवर अवलंबून आहे. मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागणारे घटक (Components) प्रामुख्याने चीन आणि तैवानमधून आयात केले जातात. सौर ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे सोलर सेल्स आणि मॉड्यूल्ससाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. शेतीसाठी आवश्यक असणारी रासायनिक खते आणि विशिष्ट औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात आयात करावी लागतात. आपण आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बाहेरच्या देशांतून आयात केलेल्या गोष्टींवर किती जास्त प्रमाणात अवलंबून आहोत, आणि आपलं हे परावलंबित्व कमी करण्यासाठी आपण पर्यायी मार्गांचा विचार आणि वापर लवकरात लवकर करणं, आता खूप गरजेचं झालेलं आहे.!🎭