ओढ
हे हवं तेव्हा, हव्या त्या ठिकाणी अगदी तप्त्परतेने
उपस्थित होता न येणं, कधीकधी किती त्रासदायक असतं ना.
म्हातारी म्हातारी गावकडे राहत होते. दोन्हीं मुलं आपापल्या बायका पोरांसोबत कामाच्या ठिकाणी मोठ्या शहरात मुक्कामी. त्यांनी कितीही या या म्हटलं तरीही आई बापाची आपल्या राहत्या घराची ओढ काही सुटत नव्हती, आणि शेवटच्या श्वासापर्यंत सुटली ही नाही. आपल्या बापाला असं अचानक काहीतरी होईल असं त्या लेकरांना कधीही वाटलं नव्हतं, आणि बापाच्या जाण्याच्या धक्क्याने आईही अचानक जाईल, असा विचार तर स्वप्नातही केला नसेल. पण बहुतेक आयुष्य #आयुष्य_वगैरे जे काही म्हणतात ना, ते हेच असावं. इथल्या या आयुष्याच्या पटकथेत कधी, कुठं, कसं आणि काय घडेल, हे साक्षात ईश्वराला ही ज्ञात नसावेच, आणि आपण पडलो हाडामांसाची सामान्य माणसं.!🎭