आभाळमाया

मी रोज माझ्या काळजाचा तुकडा शाईच्या रूपाने कागदावर उतरवतो. हे सगळं या आशेने की कधीतरी माझ्या या शब्दांच्या लाटा तिच्या मनाच्या किनाऱ्याला स्पर्श करतील. पण दुर्दैवाने वास्तव हेच आहे की, माझे शब्द तिच्यापर्यंत पोहोचण्याआधी वाटेतच विरून जातात. मी तिच्यासाठी शब्दांचं आभाळ उभं केलं, पण तिला मात्र साध्या सावलीचाही पत्ता लागला नाही. कदाचित तिला माझ्या भावनांची भाषा, त्यातील प्रेम, माझ्या मनाची तडफड, तगमग कळतच नसावी, आणि बहुतेक तिची मला समजून घेण्याची ओढ यात खूप मोठं अंतर असावं. माझं हे सगळं काही लिहिणं, लिहितच राहणं, हे आता केवळ तिच्यासाठी उरलं नसून, ते माझ्या मनाचं ओझं हलकं करण्याचं एक साधन बनलं आहे. कारण समोरून तिचा काहीच प्रतिसाद नसला तरीही, माझे हे शब्दच आता माझे सोबती झाले आहेत.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट