आठवणींचा चक्रव्यूह...

आतल्या आत सगळं संपलंय, आपण पूर्ण कोलमडलोय याची स्पष्ट जाणीव असूनही मन त्याच त्या दुखऱ्या जागेवर जाऊन थांबतं. कधी नकळत तर कधी मुद्दाम, आपण स्वतःच आपल्या जखमा ओरबाडत राहतो. जो विषय काळजाला जिव्हारी लागलाय, ज्याने आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्याचाच विचार पुन्हा पुन्हा करणे हा एक मानसिक छळ बनला आहे. हे माहीत असूनही की यामुळे फक्त वेदनाच वाढणार आहेत, आपण त्या कटू आठवणींच्या चक्रातून स्वतःला बाहेर काढू शकत नाही. कदाचित त्या दुःखाची आता इतकी सवय झाली आहे की, त्या वेदनेमध्येच मन स्वतःचे अस्तित्व शोधू पाहते. स्वतःला अजून किती त्रास द्यायचा हे समजत नाही, पण त्या जुन्या जखमांना सतत हात लावण्याची ही सवय मनाला एका न संपणाऱ्या अंधारात ढकलत चालली आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट