डोह आठवणींचा... ❤️
माणसाचं मन हे जगातील सगळ्यात अजब रसायन आहे. माणसाच्या या मनाच्या अथांग डोहात काही आठवणी अशा काही स्थिरावतात की, कितीही सुसाट वादळ वारं आलं तरी त्या आपली जागा सोडत नाहीत. आपण ज्या गोष्टी विसरण्यासाठी जीवाचा आकांत करतो, नेमक्या त्याच गोष्टी मनाच्या भिंतीवर अधिक गडद होत जातात. कितीही प्रयत्न केले, स्वतःला कामात कितीही गुंतवून ठेवलं, किंवा आभासी आनंदाचे कितीतरी रंगबिरंगी मुखवटे चढवले, तरीही शांततेच्या एका क्षणात त्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात. कधीकधी वाटतं की विसरणं सोप्पं असतं, पण काही माणसं, त्यांनी दिलेले सुखाचे क्षण किंवा त्यांनीच मागे ठेवलेले दुःखाचे घाव काळजाच्या इतके आरपार गेलेले असतात की, तिथे त्या सर्वव्यापी काळाचा मलमही निष्प्रभ ठरतो. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, समोर संकटांचे डोंगर उभे राहिले आणि परिस्थितीने आपल्याला पार बदलून टाकलं, तरीही भूतकाळातील ते विशिष्ट प्रसंग मनात एखाद्या दीपगृहासारखे जळत राहतात. खरंच, काही गोष्टी विसरता येत नाहीत, कारण त्या केवळ आठवणी नसतात, तर त्या आपल्या अस्तित्वाचा, आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेल्या असतात. आपण त्या आठवणींसोबत जगायला शिकतो, हसायला शिकतो आणि कधीकधी रडायलाही शिकतो. पण त्यांना मनातून पूर्णपणे काढून टाकणं आपल्याला कधीच शक्य होत नाही. शेवटी न विसरता येणाऱ्या याच गोष्टी माणसाला संवेदनशील ठेवतात, त्याच्यातलं माणूसपण जिवंत ठेवतात, आणि त्याच्या जगण्याला एक वेगळा अर्थ देतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂