न सुटलेलं कोडं... ❤️
कधी कधी माणसाचं मौन हे शब्दांपेक्षाही जास्त धारदार असतं, याची प्रचिती मला रोज येत आहे. मी मनातील भावनांचा एकेक तुकडा करून कागदावर उतरवतो, आणि ती ते सगळं अगदी सहज वाचते आणि नेहमीसारखीच मौन राहते. माझ्या शब्दाशब्दांतून वाहणारी तगमग, रात्रभर चालणारी माझ्या मनाची तडफड आणि तिच्यासाठी चाललेली ही माझी तळमळ तिला स्पष्ट दिसत असेलच. तरीही तिच्या चेहऱ्यावर, तिच्या वागण्यात एक संभ्रमी शांतता कशी काय असू शकते.? एका निष्पाप मनाच्या वेदना पाहूनही तिच्या मनात ममतेचा एकही पाझर का बरं फुटू नये, याचं मला अतोनात आश्चर्य वाटतं. हे परमेश्वरा, एखादी व्यक्ती इतकी कठोर, इतकी निष्ठूर कशी काय बनू शकते.? जिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, ती माझ्याशी इतकी क्रूर आणि निष्ठर कशी वागू शकते.? मी तिच्या एका शब्दासाठी, एका आपुलकीच्या नजरेसाठी आसुसलो आहे, आणि हे सगळं माहीत असूनही ती माझ्या या विनाशाकडे अत्यंत तटस्थपणे पाहत आहे. माझ्या निस्सीम प्रेमाची परिणती आज फक्त उपेक्षेत झाली आहे. तिची माझ्याबद्दलची ही कमालीची उदासीनता माझ्या अस्तित्वाला रोज आतून पोखरत चालली आहे. कदाचित माझं अथांग प्रेमच तिच्यासाठी एक सवय बनलंय, म्हणूनच माझ्या अश्रूंचं तिला आज काहीच वाटत नाहीये, त्याचं काही मोलही उरलेलं नाहीये.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂