थलापती... ❤️‍🩹

मी कोणी पडद्यावरचा 'थलापती' नाही, न माझा तसा रुबाब आहे, न ती शरीरयष्टी. वाढत्या वयासोबत निसर्गाच्या नियमाप्रमाणे माझेही केस आणि दाढी आता पांढरी होऊ लागली आहे. मी त्याला रंगांचा खोटा मुलामा देऊन लपवण्याचा प्रयत्न केला नाही, इतकंच काय ते माझे वेगळेपण. पण माझी ही 'सॉल्ट अँड पेपर' स्टाईल पाहून ऑफिसमधील सहकारी आणि मित्रपरिवार मला आजकाल गंमतीने 'थलापती' म्हणून हाका मारतात. त्यांच्यासाठी ती केवळ एक रोजची थट्टा असते, चेष्टेचा एक सहज क्षण असतो, आणि त्याचं मला विशेष काही वाईट वगैरे वाटतं असंही काही नाही. पण त्यांच्या त्या एका शब्दासरशी माझ्या मनाचा कोपरा तीव्रतेने पेटून उठतो. चित्रपटामधल्या थलापतीच्या सोबतीला नेहमीच त्याची 'त्रिशा' असते, आणि ती ख-या आयुष्यात ही त्याच्या सोबतीला उभी असते. पण माझ्या आयुष्यातून मात्र माझी 'त्रिशा' कायमची दूर निघून गेली आहे, याची जाणीव मला त्या प्रत्येक क्षणी अत्यंत तीव्रतेने आणि वेदनादायी पद्धतीने होते. लोकांना माझ्या पांढऱ्या केसांत एक स्टार दिसतो, पण मला त्यात फक्त माझ्या एकाकीपणाची चाहुल लागते. जेव्हा जेव्हा 'थलापती' अशी हाक कानावर पडते, तेव्हा तेव्हा भूतकाळातील सोनेरी पाने डोळ्यांसमोरून सरकतात. 'ती' अजूनही सोबत असती, मला असं एकाकी सोडून निघून गेली नसती, तर कदाचित मला माझ्या या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांचेही कौतुक वाटलं असतं. पण आता त्या दोघीही माझ्या आयुष्याचा भाग उरलेल्या नाहीत, हे कटू सत्य मला रोज स्वीकारावं लागतं. जगासमोर हसताना आणि मित्रांच्या थट्टेत सामील होताना आतून मात्र मन त्या दोघींच्या आठवणीने सतत व्याकुळ होत राहतं. हा पांढरा रंग वयाचा जितका नाही, तितका तो त्या दोघींच्या विरहाच्या छायेचा वाटू लागतो. शेवटी, पडद्यावरचा थलापती सिनेमा संपला की त्याच्या ख-या आयुष्यात त्याच्या त्रिशाला पुन्हा भेटू शकतो, पण माझ्या या खऱ्या आयुष्याच्या खेळातून माझ्या त्या दोघीही मात्र कधीच्या निघून गेलेल्या आहेत, आणि ते सुद्धा कायमस्वरूपी. अन् हे दुःख घेऊनच मला रोज जगावे लागते, आणि जगतच रहावे लागणार आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट