विसावा..

दिवसाच्या त्या लख्ख प्रकाशात जगाला हवं तसं वागण्यासाठी आपण सगळेच आपल्या चेहऱ्यावर एक अदृश्य मुखवटा चढवून फिरत असतो. कोणासाठी तरी हसणं, कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करणं आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या या शर्यतीत आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. पण जसजशी संध्याकाळ होते आणि हळूहळू अंधार दाटून येतो, तसं आपल्या मनावरचं ते ओझं अलगद हलकं व्हायला लागतं. रात्रीचा तो गर्द अंधार भीतीदायक नाहीतर, एका जुन्या मित्रासारखा वाटायला लागतो, जो आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारायला नेहमीच तयार असतो. त्या शांततेत आपल्याला कोणालाही काही स्पष्टीकरण द्यावं लागत नाही की खोटं हसावं लागत नाही. त्या काळोखात आपण आपले डोळे मिटून स्वतःच्या मनाशी संवाद साधू शकतो. ती गर्द अंधारी रात्र म्हणजे केवळ विश्रांतीची वेळ नाही, तर ती स्वतःला पुन्हा मिळवण्याची एक संधी असते. तिथे आपण आपल्या जखमा, आपले अश्रू आणि आपले खरे विचार मुक्तपणे मांडू शकतो. शेवटी, हाच तो काळ असतो जेव्हा आपण जगासाठी 'कोणीतरी' असण्यापेक्षा स्वतःसाठी 'स्वतः' असतो. पुन्हा एकदा नव्या दिवसाचा एक नवा मुखवटा चढवण्यासाठी लागणारी ताकद ही गर्द अंधारी रात्रच आपल्याला तिच्या मायेच्या उबदार मिठीत देत असते.!🎭

#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट