काहीतरी वेगळं..
हा असह्य, अंगाची लाहीलाही करणारा कडक उन्हाळा म्हणजे निसर्गाच्या एका महाभयंकर बदलाची संथ सुरुवात आहे. विज्ञानाच्या नियमांनुसार, अतिउष्णतेचा हा कळस म्हणजेच एका नव्या, शांत आणि गोठवणाऱ्या हिमयुगाची साक्षात नांदी आहे. पण आपल्या या पिढीचं आणि आपल्यानंतर येणाऱ्या हजारो पिढ्यांचं हे केवढं मोठं दुर्दैव आहे ना, आपण रोज निसर्गाचा हा रौद्र अवतार सोसत आहोत, घामाच्या धारा गाळत आहोत. पण पृथ्वीचं ते शांत, पांढरेशुभ्र रूप पाहायला आपण या जगात नसू. सृष्टीचा हा अदभुत चक्राकार बदल अनुभवायला आपलं आयुष्य फारच छोटं आणि मर्यादित आहे. जेव्हा ही धरती बर्फाची चादर पांघरून सुखाची झोप घेईल, तेव्हा आपण फक्त धुळीचे कण बनून कुठेतरी विरून गेलो असू. हा विचारच मनाला एका अनामिक हताशतेने आणि हुरहुरीने भरून टाकतो. आपण एका अशा प्रवासाचे प्रवासी आहोत, ज्याचा शेवटचा नितांत सुंदर टप्पा आपल्या नशिबातच नाही. या उष्णतेच्या छळाला सोसताना, त्या येणाऱ्या शीतल हिमयुगाची केवळ कल्पनाच आपण करू शकतो, हीच मानवी अस्तित्वाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂