शब्दसखा
मनात येणारे विचार जसेच्या तसे कागदावर उतरवणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्यासारखं आहे. तिथे शब्दांना व्याकरणाचं बंधन नसतं की विचारांना साच्यात बसवण्याची ओढ, असतो तो फक्त एक मुक्त प्रवाह. त्यात कधी दिवसभराचा थकवा असतो, तर कधी भविष्याची स्वप्नं आणि वर्तमानातील संभ्रम. हे असं #मनात_येईल_ते लिहिणं म्हणजे मनाचा आरसा साफ करण्यासारखं आहे, जिथे प्रत्येक शब्दासोबत मनावरचं ओझं हलकं होत जातं. जेव्हा जग आपल्याला समजून घेऊ शकत नाही, तेव्हा हे आपलेच शब्द आपल्याला शांतपणे साथ देतात.!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂