ही तुझी आठवण टाळली पाहिजे... ❤️‍🩹

काळाचा महिमा किती अजब आहे ना.! एकेकाळी रात्री डोळे मिटताना आणि सकाळी डोळे उघडताच मनात फक्त तिचाच विचार असायचा. रात्रभर स्वप्नातही फक्त आणि फक्त तीच धुमाकूळ घालायची. तेव्हा वाटायचं की, ती श्वासासारखी सोबत राहावी, तिने कधीच माझ्या नजरेआड होऊ नये, आणि तिच्याशिवाय या जगण्याला काही अर्थच नाही. पण आज, मनातल्या भावनांचं ते साम्राज्य पार 
उध्वस्त झालंय. ज्या व्यक्तीच्या अस्तित्वासाठी मी कधीकाळी देवाकडे साकडं घालायचो, माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी ज्या व्यक्तीचं सुख मागायचो, ज्या व्यक्तीसाठी मी जातीधर्माच्या भिंती ओलांडून प्रत्येक देवासमोर हात पसरले, आज तिच्याच आठवणींचा एखादा काजवा मनात क्षणभर जरी चमकून गेला तरीही अंगावर काटा येतो. मन आता इतकं थकलंय आणि दुखावलं गेलंय की, तिची सावलीही पुन्हा आयुष्यात येऊ नये असं वाटत आहे. हा तिरस्कार नाहीये, माझं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं अन् अजूनही खूप खूप खूप प्रेम आहे, पण तिच्याकडून माझ्या वाट्याला सतत येणारी उपेक्षा आता मला सहन होत नाहीये. स्वतःला अधिक तुटण्यापासून वाचवण्याचा हा माझा एक प्रामाणिक आणि केविलवाणा प्रयत्न आहे. आणि प्रेम जिथे पराकोटीचं असतं, तिथेच दुरावा ही सुखाचा वाटू लागतो. म्हणून आता ती पुन्हा पुन्हा सतत समोर आली, तर त्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतील, आणि त्या वेदना झेलण्याची ताकद आता माझ्यात उरलेली नाही. म्हणूनच, तिचं माझ्यापासून दूर असणंच आता नाईलाजाने माझ्या जगण्याचा एकमेव आधार बनलं आहे..!🎭
#आयुष्य_वगैरे ❤️‍🩹🫂

लोकप्रिय पोस्ट